दैनिक कार्यक्रम

-- श्री तुकाई देवीची आरती --

चत्रशिंग डोंगरवरुनी सत्यानी जातो अंबा सत्यानी जातो,
त्रिभुवनी तिन्ही ताळ अंबा चरणी खेळतो,
चंडमुंड मृदुंग म्हैषासुरारी नांदतो, घालूनी पाया स्थळी,
घालुनी चरणास्थळी केला आपला रहिवास आनंदी जय देवी जय || १ ||
जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || धृ. ||

शेवाळ तळ तिथं अंबेचं ठाणं तिथे गं नांदे ॠषी मल्हार मार्तंडराव
अवधूत राव चरणी मागतो ठावं देखीले मूळ बेट, देखीले मूळ बेट
आईचा हरला शृंगार आनंदी जय देवी जय
जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || २ ||

घाट शिळावरी अंबा उभी राहशी भवानी उभी रहाशी
शिळावरुनी पाहे, घाटावरुनी पाहे वाट भक्ताची, भक्ताची पाहसी
झळकले बाळ भक्ता सामोरा येशी
उचलून करवड घेऊन आपल्या राऊळाला जाशी
आनंदी जय देवी
जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || ३ ||

परडी हातात अंबाच्या परडी हातात
नऊ खंडाचा जोगवा करुनी आली राऊळात
आनंदी जय देवी जय
संबळ गजरला अंब्याचा संबळ गरजला
संबळीच्या नाद संबळीच्या नाद
सारा अंबर गरजला आनंदी जय देवी जय || ४ || (उजवी फेरी)

जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || धृ. ||
नाकी मुक्ताफळं रंगल्या हिऱ्यांच्या ज्योती
कंपळी भांग टिळा, ललाटी भंग टिळा आईच्या राण्या पाजळती
राण्या पाजळती गळा सुर्याच्या शोभती २
आनंदी जय देवी जय || ५ ||

जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || धृ. ||
गाईचे कोल्हार वाघ्या वाजे खुळखुळा
संबळाच्या धुणावर संबळीच्या नादानं अंबा चाले वेल्हाळ
शहारूप सुंदर अंबा देखीला डोळा २
लेली सर्व लेणं आईच्या गळा घालू माळा
आनंदी जय देवी जय || ६ ||

जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || धृ. ||
गरुडावरी बैसूनी अंबा वरदान मागे, भवानी वरदान मागे
जन्मामुळे सेवा दे गं दे गं जगदंबे
आनंदी जय देवी जय
जय रामा जय भवानी तु कृपावंत सावळे रामा चिंतात
आरती ओवाळू मूळ माया रेणुका आनंदी जय देवी || ७ ||

आरतीचे पावन, पंढरीचे राम २
देवीच्या अंगणी बोलविले, आईच्या अंगणी बोलविले
बोलविले आई, पहाटेच्या गजरी
अश्वद चरणी लोळत असे पितांबर चरणी लोळत असे
लोळे पितांबर, गळा रुद्राक्षाची माळ
विठ्ठल सावळा येईल घरा, पांडूरंग सावळा येईल घरा
येईल घरा माझ्या, भेटेल उपलांती
राजाराम माऊली कधी भेटं, श्रीरंग माऊली कधी भेटं
आरती पावन पंढरीचे राम
देवीच्या अंगणी बोलविले, आईच्या अंगणी बोलविले || ८ ||

Go Top