सौजन्य


वेबसाईट डिझाईन अँड डेव्ह्लोपमेंट
मोब- ९०४९००८७२६, ९७६७२८१६६९

ऐतिहासिक माहिती

श्री तुकाई मातेच्या या स्मृती स्थानाबाबत एक आख्यायिका सांगण्यात येते की, कै. सटवाजी बुवा शेळके हे तुळजापूरच्या भवानी मातेचे भक्त होते. दरवर्षी नवरात्रामध्ये वाडेगव्हाणहून तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचे पायी जाणे व त्यांची भक्ती यावर भवानी माता प्रसन्न झाली. भक्तावरील प्रेमामुळे देवीने त्यांना वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी देवीला आपल्या घरी येऊन दर्शन देण्याची इच्छा प्रकट केली. त्यावर देवीने सांगितले की, मी तुझ्या घरी येईल परंतु तू घरी जाईपर्यंत मागे वळून पहावयाचे नाही. ही देवीची अट मान्य करून ते घराच्या देशेने चालू लागले. तुळजापूरहून वाडेगव्हाण येथे येईपर्यंत त्यांनी मागे वळून पहिले नाही. परंतू त्यांनी घरासमोरील शेतामध्ये पाऊल टाकल्यानंतर खरोखरचं देवी आपल्यामागे आली आहे का ? हे वळून पाहीले तर देवी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभी होती. त्यांना देवीने भक्ताला आपली इच्छा सांगितली, आता या ठिकाणीच माझे स्थान आहे. मी सर्व भक्तांना याठिकाणी दर्शन देईल. म्हणून त्याच ठिकाणी कै. सटवाजी बुवांनी स्वतः अहोरात्र कष्ट घेऊन देवीच्या मंदीराची उभारणी केली, व त्याठिकाणी दरवर्षी नवरात्रामध्ये देवीची आराधना करू लागले. तीच परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी आजही चालू ठेवली आहे.

-- जुने तुकाई देवी मंदिर --

Go Top