श्री क्षेत्र तुकाई देवी ट्रस्ट आपले स्वागत करीत आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे वाडेगव्हाण गावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी विविध ठिकाणाहून येणाऱ्या हजारो भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो.

वाडेगव्हाण हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अहमदनगर-पुणे महामार्गावर आहे. गावाच्या पूर्वेकडे १ कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर तुकाईमातेचे मंदिर आहे. त्या टेकडीच्या चोहोबाजूंनी हिरवीगार दाट झाडी, हिरवीगार शेती, जवळून वाहत असलेली महेश्वरी नदी, हिरवेगार डोंगर आणि तलाव यांनी नटलेल्या टेकडीला ‘ तुकाई माळ ’ किंवा ‘ तुकाई गड ’ असे म्हणतात.

पुढे वाचा ...

बातम्या आणि कार्यक्रम

सौजन्य

वेबसाईट डिझाईन- श्री. गणेश रा. शेळके
मोब- ९०४९००८७२६, ९७६७२८१६६९

Go Top