वाडेगव्हाण व पंचक्रोशीतील देवस्थाने

प्रभू देव मंदिर, वाडेगव्हाण -

प्रभू देव मंदिर हे फार वर्षापुर्वीचे असून, त्या मंदिराचा जीर्णोद्धार २ वर्षांपूर्वी केला. हे देवस्थान गावाचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी या देवाची यात्रा अक्षय तृतियेच्या दुसऱ्या दिवशी भरते.


मळगंगा देवी मंदिर, वाडेगव्हाण -

हि देवी निघोज ची मळगंगा देवीच आहे. ह्या देवीचे मंदिर तुकाई देवी कडे जाताना लागते. ह्या देवीची यात्रा नवरात्रामध्ये सातव्या दिवशीच भरते व पालखी मुरवणूक दह्व्या दिवशी म्हणजे विजयादशमी च्या दिवशी निघते. ह्या दिविला लोक मनोभावे दर्शन घ्यायला येतात.


रांजणगाव महागणपती -

महागणपती मंदिर हे ४०० वर्षापुर्वीचे असून, त्याच्या दगडी गाभाऱयाचे काम पेशवाईमध्ये झाले असून, सवाई माधवराव पेशवे यांनी हे बांधकाम केले आहे. मंदिराचे उजव्या बाजूला दगडी ओवऱया श्रीमंत पेशव्याचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी बांधलेल्या आहेत. लाकडी मंडपाचे काम इंदुर येथील सरदार किबे यांनी केले आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना, दगडी वेस व मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळ प्राचीन वास्तूची आठवण करून देते. चिंचवड येथील महान गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांचे आदेशावरून देव कुटुंबिय येथे महागणपतीची सेवा करीत आहे. श्री मोरया गोसावी यांनी दिलेल्या पंचधातुची उत्सवमुर्ती अजूनही मंदिरात व उत्सवात विराजमान आहे. मंदिरास ब्रिटीश सरकारकडून व नंतर शासनाकडून अल्प अनुदान चालू आहे.

धार्मिक महत्व - इच्छापूर्ती करणारा महागणपती अष्टविनायकामधील हे आठवे स्थान असून, या महागणपतीचा लौकीक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटुंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकटे महागणपतीच्या कृपाप्रसादाने दूर झाल्याचे भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनाने संकटे दूर होतात, अडचणीमधून मार्ग निघतात म्हणून भाविकांची १२ महिने याठिकाणी गर्दी असते. हे स्वयंभू स्थान असल्यामुळे रांजणगाव येथे कोठही गणेशमुर्ती वसविली जात नाही. एक गाव एक गणपती हे या ठिकाणी अनेक शतके आहे. श्री मोरया गोसावी यांच्या गणेश सांप्रदायाप्रमाणे येथील धार्मिक कार्यक्रम केले जातात. महागणपतीच्या चार दिशांना श्री देवीची मंदिरे असून, भाद्रपद व माघ उत्सवात या ठिकाणी अनवाणी पायी द्वार यात्रा करण्याची परंपरा आहे. या चारही देवी महागणपतीच्या बहिणी असून, उत्सवात या ठिकाणी देवस्थानतर्फे पुजा आणि यागे केली जाते.

ठिकाण: श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट ,रांजणगाव गणपती, पुणे - अहमदनगर राज्यमार्ग, ता. शिरुर, जि. पुणे.Go Top